दिंडोशी कोर्टात आरोपीची आत्महत्या; सहाव्या मजल्यावरून उडी टाकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
suicide

सामना ऑनलाईन । मुंबई

तारखेसाठी आर्थर रोड तुरुंगातून दिंडोशी सत्र न्यायालयात आणलेल्या एका (21) आरोपीने पोलीस गार्डच्या हाताला झटका देऊन थेट कोर्टाच्या सहाव्या मजल्यावरून खाली उडी टाकली. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. विकास पवार असे मृत आरोपीचे नाव होते.घाटकोपर येथे राहणाऱया विकासला पवई पोलिसांनी 2015 साली एका अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी बलात्कार आणि ‘पोक्सो’च्या गुन्ह्यात अटक केली होती. त्या गुह्यात विकास आर्थर रोड तुरुंगात होता. त्याला आज सुनावणीसाठी पोलिसांनी दिंडोशी सत्र न्यायालयात आणले होते. कोर्टाच्या सहाव्या मजल्यावर आल्यानंतर विकासने सोबत असलेल्या पोलीस गार्डच्या हाताला झटका दिला आणि सहाव्या मजल्यावरून खाली उडी टाकली. खाली पडल्यानंतर विकासचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कुरार पोलिसांनी कोर्टात जाऊन पंचनामा केला आणि विकासचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी कुरार पोलीस अधिक तपास करीत आहेत.