‘दोपहर का सामना’चे सहाय्यक संपादक प्रेमचंद शर्मा यांचे आकस्मिक निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

ज्येष्ठ पत्रकार व ‘दोपहर का सामना’चे सहाय्यक संपादक प्रेमचंद शर्मा यांचे आज शीव येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 55 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.

‘दोपहर का सामना’च्या स्थापनेपासून कार्यरत असलेल्या प्रेमचंद शर्मा यांनी मुंबईतील पहिले सायं दैनिक असलेल्या ‘निर्भय पथिक’मधून आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली होती. तीन दशकाच्या कारकिर्दीत त्यांचा विविध पुरस्कारांनी सन्मान झाला आहे. आज सकाळी अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर शीव येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबरच सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.