
सामना प्रतिनिधी । नगर
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नगर शाखेचे सर्व सदस्य तसेच शहरातील खासगी डॉक्टरांनी दिल्लीगेट पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत देशव्यापी संपाला आज पाठिंबा दिला.
या मोर्चात नगर शाखेचे अध्यक्ष डॉ. शंकर शेळके, सेक्रेटरी डॉ. अनिल सिंग, डॉ.अमित खराडे, उपाध्यक्ष डॉ. सागर वाघ, डॉ.नरेंद्र वानखेडे, डॉ. निसार शेख, डॉ.बापूसाहेब कांडेकर, डॉ. महेश वीर, डॉ. रवींद्र साताळकर, डॉ.विजय पाटील, डॉ.प्रकाश कांकरिया, डॉ.अर्जुन शिरसाठ, डॉ. सुधा कांकरिया, डॉ.रजिया निसार, डॉ.कांचन रच्चा, डॉ.सुवर्णा होशिंग, डॉ.सुप्रिया वीर, डॉ.सागर झावरे यांच्यासह डॉक्टर्स सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर तेथे निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना निवेदन देण्यात आले.



























































