CWC2019 : हिंदुस्थानचा सेमी फायनलमध्ये प्रवेश, बांग्लादेशचे आव्हान संपुष्टात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बर्मिंघम

हिंदुस्थानने बांग्लादेशचा 28 धावांनी पराभव करत सेमी फायलनमध्ये झोकात प्रवेश केला, बांग्लादेशचे आव्हान संपुष्टात आले आहे. विजयासाठी 315 धावांचा पाठलाग करताना बांग्लादेशचे संघ 285 धावांमध्ये गारद झाला. हिंदुस्थानकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 बळी घेतले, तर पांड्याने 3 बळी घेत त्याला उत्तम साथ दिली. चहल, शमी आणि भुवीला प्रत्येकी एक बळी मिळाला.

त्याआधी टीम इंडिया आणि बांग्लादेशच्या संघात बर्मिंघमच्या एजबस्टन मैदानात रंगलेल्या लढतीत विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. लोकेश राहुल आणि रोहित शर्माने 180 धावांची सलामी दिली. रोहित शर्माने वर्ल्डकपमधील चौथे शतक झळकावत 104 धावा केल्या. लोकेश राहुलने 77, ऋषभ पंतने 48 आणि धोनीने 35 धावा करत हिंदुस्थानला 300 धावांचा टप्पा पार करून दिला. हिंदुस्थानने बांग्लादेशसमोर 316 धावांचे आव्हान ठेवले.

  • बांग्लादेशचा संघ ऑलआऊट
  • बांग्लादेशला नववा धक्का, बुमराहने घेतला तिसरा बळी
  • सैफुद्दीनचे अर्धशतक
  • अखेरच्या 30 चेंडूत 51 धावांची आवश्यकता
  • बांग्लादेशला आठवा धक्का, भुवीने घेतली विकेट

  • शब्बीर रहमान 36 धावांवर बाद
  • बांग्लादेशला सातवा धक्का, बुमराहने जोडी फोडली
  • बांग्लादेशच्या 250 धावा पूर्ण
  • सैफुद्दीन आणि शब्बीरमध्ये 50 धावांची भागिदारी
  • अखेरच्या 60 चेंडूत 90 धावांची आवश्यकता
  • 40 षटकानंतर बांग्लादेशच्या 6 बाद 225 धावा
  • बांग्लादेशच्या 200 धावा पूर्ण
  • पांड्याने 66 धावांवर केले बाद
  • बांग्लादेशला मोठा धक्का, शाकिब बाद

  • बांग्लादेशचा निम्मा संघ तंबूत
  • हार्दिक पांड्याने घेतला सामन्यातील दुसरा बळी
  • हिंदुस्थानला चौथे यश, लिट्टन दास बाद

  • बांग्लादेशच्या 150 धावा पूर्ण
  • शाकिब-अल-हसनचे अर्धशतक
  • 25 षटकानंतर बांग्लादेशच्या 3 बाद 127 धावा
  • चहलने घेतली विकेट
  • हिंदुस्थानला तिसरे यश, मुशफिकूर रहीम बाद

  • 20 षटकानंतर बांग्लादेशच्या 2 बाद 104 धावा
  • बांग्लादेशच्या 100 धावा पूर्ण
  • पांड्याने 33 धावांवर केले बाद
  • हिंदुस्थानला दुसरे यश, सरकार बाद

  • 15 षटकानंतर बांग्लादेशच्या 1 बाद 73 धावा
  • बांग्लादेशच्या 50 धावा पूर्ण

आयपीएलनंतर वर्ल्डकपच्या आजी व्हायरल, टीम इंडियाला फुल्ल सपोर्ट

  • 10 षटकानंतर बांग्लादेशच्या 1 बाद 40 धावा
  • मोहम्मद शमीने घेतला पहिला बळी
  • हिंदुस्थानला पहिले यश, तमिम इक्बाल 22 धावांवर बाद

  • सात षटकानंतर बांग्लादेशच्या बिनबाद 28 धावा

  • 5 षटकानंतर बिनबाद 18 धावा
  • बांग्लादेशची फलंदाजी सुरू
  • हिंदुस्थानच्या 50 षटकात 9 बाद 314 धावा
  • हिंदुस्थानला सातवा धक्का, धोनी 35 धावांवर बाद
  • हिंदुस्थानच्या 300 धावा पूर्ण
  • हिंदुस्थानचा सहावा धक्का, कार्तिक बाद

वर्ल्डकपमध्ये रो’हिट’! जीवदानानंतर तीन शतकी, एक अर्धशतकी खेळी

  • हिंदुस्थानचा निम्मा संघ तंबूत, पंत 48 धावांवर बाद

  • 40 षटकानंतर हिंदुस्थानच्या 4 बाद 251 धावा
  • हिंदुस्थानच्या 250 धावा पूर्ण
  • हिंदुस्थानला चौथा धक्का, पांड्या शून्यावर माघारी

  • हिंदुस्थानला तिसरा धक्का, कर्णधार विराट बाद
  • 35 षटकानंतर हिंदुस्थानच्या 2 बाद 211 धावा
  • हिंदुस्थानच्या 200 धावा पूर्ण
  • राहुल 77 धावांवर बाद
  • हिंदुस्थानची सलामीची जोडी तंबूत

  • 30 षटकानंतर हिंदुस्थानच्या 1 बाद 181 धावा
  • शतकानंंतर रोहित शर्मा 104 धावांवर बाद
  • एक दिवसीय कारकीर्दीतील 26 वे शतक
  • रोहितचे वर्ल्डकपमधील चौथे शतक, संघकाराच्या विक्रमाशी बरोबरी

  • 25 षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 162 धावा
  • हिंदुस्थानच्या बिनबाद 150 धावा पूर्ण
  • 20 षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 122 धावा
  • वर्ल्डकपमधील दुसरे अर्धशतक
  • लोकेश राहुलचे अर्धशतक

  • हिंदुस्थानच्या बिनबाद 100 धावा पूर्ण

  • ड्रिंक ब्रेकपर्यंत हिंदुस्थानच्या बिनबाद 99 धावा

धोनीआधी ‘वन डे’मध्ये पदार्पण करणारा खेळाडू 15 वर्षानंतर खेळणार वर्ल्डकप सामना

  • 15 षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 87 धावा
  • रोहित शर्माचे अर्धशतक

  • हिंदुस्थानची दमदार सुरुवात, पहिल्या पॉवरप्लेमध्ये बिनबाद 69 धावा

  • हिंदुस्थानच्या बिनबाद 50 धावा पूर्ण
  • पाच षटकानंतर हिंदुस्थानच्या बिनबाद 21 धावा
  • रोहित शर्माला जिवदान, तमिन इक्बालने सोडला झेल

  • पहिल्या षटकानंतर बिनबाद 10 धावा
  • हिंदुस्थानची फलंदाजी सुरू, रोहित-राहुल मैदानात
  • वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघात 3 लढती झाल्या असून 2 हिंदुस्थानने आणि 1 बांग्लादेशने जिंकली आहे
  • हिंदुस्थानने 29, तर बांग्लादेशने 5 लढतीत विजय मिळवला आहे
  • दोन्ही संघात आतापर्यंत 35 एक दिवसीय लढती झाल्या आहेत
  • भुवनेश्वर कुमार, दिनेश कार्तिकला संघात स्थान
  • केदार जाधव, कुलदीप यादवला आराम

  • बांग्लादेशविरुद्ध नाणेफेक जिंकून हिंदुस्थानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय