शिवसेना-भाजपा फेव्हीकॉल का जोड है… टुटेगा नही – क्षीरसागर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
jaydutt-kshirsagar

सामना प्रतिनिधी । बीड

शिवसेना पक्षबांधणीसाठी आता प्रत्येकाने कामाला लागावे. पक्ष मजबूत असला की नेतृत्वाला उभारी येते. आणि हो युतीची काळजी करू नका शिवसेना-भाजपा फेव्हीकॉल का जोड है टुटेगा नही… असा विश्वास रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड तालुक्यातील पाली येथील शिवसैनिकांच्या मेळाव्यात दिला.

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये शिवसैनिकांचे आणि कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत. सोमवारी पाली येथे आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. बोलताना ते म्हणाले, पक्ष बांधणीसाठी कामाला लागा, पक्ष मजबूत असला की नेतृत्वाला नक्की उभारी येते. शिवसेना-भाजपा फेव्हीकॉलचा जोड आहे, तुटणार नाही असे म्हणत आपण विश्वासाचे राजकारण करू. ज्यांना कधीच काही द्यायचे माहित नाही त्यांना फक्त दिखाव्याची गरज असते. गेल्या तीन वर्षात प्रत्येक गावाला किती निधी आला याच्या याद्या करणे सुरू आहे. त्या याद्या ग्रामसभेत वाचन केल्या जातील. बीड जिल्ह्यात रस्ते विकासाला सरकारकडून झुकते माप मिळाले आहे. पालकमंर्त्यांनी मोठा निधी या विकासकामासाठी मिळवला आहे असे म्हणत प्रत्येक शिवसैनिकांनी रेशनकार्ड आणि गॅसवाटप ही धडक मोहिम घराघरात पोहचवावी, ज्यांना अद्याप मावेजा मिळाला नाही. त्यांचा शोध घ्या, त्यांचा मावेजा मी मिळवून देतो. आपल्या खात्यांतर्गत असणारे सर्व प्रलंबित प्रकरणे मंजूर केले आहेत. गावात तातडीने पाणंद रस्ते होण्यासाठी मागण्या करा असेही त्यांनी शिवसैनिकांना सूचवले. यावेळी यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, बाळासाहेब आंबुरे यांच्यासह शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.