
सामना प्रतिनिधी, मुंबई
सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीला भरधाव टेम्पोने मागून जोरदार धडक दिल्याने मागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू तर चालक जखमी झाल्याची घटना शिवडी येथे घडली. याप्रकरणी टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऍण्टॉप हिल येथे राहणारा युसूफ सय्यद (26) हा त्याचा मित्र प्रदीप उपाध्याय याच्या सोबत दुचाकीवरून झकेरिया बंदर रोडवरून ऍण्टॉप हिलच्या दिशेने येत होते. शिवडी कोर्टाजवळ सिग्नल लागल्याने ते तेथे थांबले होते. त्याचवेळी पाठीमागून एक टेम्पो भरधाव आला आणि त्याने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात सय्यद जखमी झाला, तर पाठीमागे बसलेला उपाध्याय याचा जागीच मृत्यू झाला.


























































