
केंद्रिय गृहमंत्री अमित शहा आठ सप्टेंबर रोजी आसाम दौर्यावर जाणार आहेत. राष्ट्रीय नागरिक रजिस्टर प्रकाशित झाल्यानंतर शहा यांचा हा पहिला आसाम दौरा असणार आहे.
या दौर्यात शहा ईशान्य परिषदेच्या सामान्य सत्रात भाग घेऊ शकतात. त्याचे आयोजन 8 आणि 9 सप्टेंबर रोजी करण्यात येत आहे. या दौर्यात शहा ईशान्येकडील सर्व मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ शकतात.
ज्यांची नावे एनआरसीमध्ये ज्यांची नावे नाहीत त्यांच्यासाठी काय करता येईल याबाबत आसामचे अर्थमंत्री हिमंता बिस्वा आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रणजित कुमार दास गृहमंत्री शहा यांच्याशी चर्चा करतील. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अमित शाह ईशान्येकडील राज्यातील सुरक्षेचा आढावा घेतील.

























































