महिलांनो निर्जन रस्त्याने प्रवास करताय, मग हा धक्कादायक व्हिडीओ पाहा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निर्जन रस्त्याने एकट्याने प्रवास करताना महिलांना अनेकदा वाईट अनुभव येतात. असाच प्रकार दिल्लीमध्ये सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दुपारच्या सुमारास एक महिला आपल्या लहान मुलाचा हात पकडून निर्जन रस्त्याने जास असताना चोरांनी तिला गाठले आणि गळ्यातील सोन्याचे दागिन चोरून फरार झाले.

व्हिडीओमध्ये महिला आणि तिचा छोटा मुलगा निर्जन रस्त्याने जाताना दिसत आहे. याच वेळी दोन दुचाकीस्वार आपली दुचाकी त्या चालत असताना पुढे रोखतात. यातील मागे बसलेला व्यक्ती गाडीवरून उतरतो आणि दुचाकीस्वार पुन्हा आल्या त्या रस्त्याने जाण्यासाठी गाडी वळवून घेतो. दुचाकीस्वार थोडा मागे जावून आपली गाडी चालू स्थितीत उभा करतो. दुचाकीवरून उतरलेला व्यक्ती महिलेचा पाठलाग करून तिच्या गळ्यातीन सोन्याच्या वस्तू झटका देऊन ओढतो आणि दोघेही पसार होतात. महिला त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करते, मात्र दुचाकीच्या वेगापुढे तिला ते शक्य होत नाही. पोलिसांनी या व्हिडीओवरून गुन्हा दाखल केला असून चोरांचा शोध सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील नांगलोई भागात सोनसाखळी चोरीचा असाच एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये महिला आणि तिची मुलगा रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेले दुचाकीस्वार सोन्याची साखळी चोरण्याचा प्रयत्न करतात. मात्र महिला धाडस करून त्यातीच एका चोराला पकडले आणि त्यांची धुलाई करते.