शिवसेना म्हणजे शिवसैनिकांच्या निष्ठेची आणि कष्टाची ताकद – जयदत्त क्षीरसागर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘शिवसेना किती कट्टर आणि कर्मठ आहे हे माझ्याएवढे दुसरे कोणी ओळखत नसेल. माझ्यावर बेतलेले असे अनेक प्रसंग मला आठवतात. कोणत्याही अमिषाला, भूलथापांना बळी न पडता मताच्या पेटीला राखण बसणारा शिवसैनिक मी पाहिला आहे. शिवसेना म्हणजे शिवसैनिकांच्या निष्ठेची आणि कष्टाची ताकद आहे’, असे गौरवोद्गार रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी काढले. बीडमध्ये शिवसेनेच्या बुथप्रमुख, गटप्रमुखांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संपर्कप्रमुख आनंद जाधव होते.

राष्ट्रवादीला धक्का, नगरसेवक रविंद्र कदम यांचा शिवसेनेत प्रवेश

अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेऊ, क्षीरसागरांच्या पाठीशी ताकद उभी करू! आनंद जाधव

पुढे बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले, शिवसेनेसारख्या पक्षात काम करण्याची मला संधी मिळाली हे मी माझे नशिब समजतो. शिवसैनिक कसा कडवट असतो, चिवट असतो याचा अनुभव मी अनेकदा घेतला आहे. वाट्टेल ते होईल पण कोणत्याही अमिषाला, भुलथापांना बळी न पडता पक्षाने दिलेले काम, सोपवलेली जबाबदारी कायम पार पाडणारा असे शिवसैनिक मी पाहिले आहेत. जातीपातीच्या पलिकडे जाऊन विकासाची विचारधारा फक्त शिवसेनेमध्ये पाहाण्यास मिळते. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हा विचार शिवसेनेतच पाहाण्यास मिळतो. माणसे जोडण्याचे काम शिवसेनेमध्ये होते. जुन्या-नव्यांचे मन जुळवण्याची प्रक्रिया आम्ही आता गतिमान केली आहे. पक्ष वाढला पाहिजे हिच माझी भूमिका आहे. माझे मंत्रीपद हे साध्य नाही तर साधन आहे. एक खंबीरपणाने सांगतो पुन्हा युतीचीच सत्ता येणार आहे. येणारा काळ हा शिवसेनेचा असणार आहे, असा विश्वास जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला.