
तालुक्यातील भटसावंगी तांडा या बंजारा बहुल गावामध्ये भर पावसातही जय भवानी जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद असा जयघोष करत नागरिकांनी शिवसेनेवरील प्रेम व विश्वास दाखवुन दिला. भटसावंगी शिवसेना शाखेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या हस्ते करण्यात आले.
कळमनुरी विधानसभा क्षेत्रांतर्गत येत असलेल्या हिंगोली तालुक्यातील भटसावंगी तांडा येथील बंजारा समाज बांधव व नागरिकांनी तसेच युवकांनी शिवसेना शाखेच्या उद्घाटनासाठी पुढाकार घेतला. या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे पदाधिकारी तांड्यावर पोहचण्याच्या आधीच पावसाला सुरुवात झाली होती. मात्र, छत्री तसेच पावसापासुन बचावासाठी डोक्यावर कापड घेत शेकडो ग्रामस्थ व तांडावासीय उपस्थित होते. पावसातच शिवसेना शाखेच्या नामफलकाचे अनावरण जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमालाही मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले. पावसातच शिवसेनेची ही सभा पार पडली. यावेळी उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, आनंदराव जगताप, कानबाराव गरड, दिनकर गंगावणे, श्रावण चव्हाण, नाना वडकुते, सुभाष वडकुते, गंगाराम पांडुळे, शंकर लोथे, सुरेंद्र ढाले, ज्ञानेश्वर चव्हाण, सुधाकर चव्हाण, शेषराव चव्हाण, सचिन जाधव, सुभाष गडदे, शिवाजी कपाटे आदी उपस्थित होते.
ढोल-ताशाचा गजर आणि शिवसेनेच्या जय जयकाराच्या घोषणा पावसातही सुरुच होत्या. यावेळी बोलतांना शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर म्हणाले की, पावसातही भिजत तुम्ही शिवसेनेवर दाखवलेले प्रेम आणि विश्वास कदापिही विसरता येणार नाही. हा सन्मान आमचा नसुन वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा सन्मान आहे. शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणीनुसार जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहु. या कार्यक्रमाला तुकाराम राठोड, प्रवीण राठोड, उत्तम राठोड, सुरेश पवार, रामराव जाधव, शंकर जाधव, विनोद जाधव, संजय राठोड, देवीदास जाधव, राहुल जाधव, अरविंद पवार, उल्हास चव्हाण, दयाराम चव्हाण, शिवाजी जाधव, कपील जाधव, सुभाष जाधव, अविनाश चव्हाण, सचिन राठोड, किरण राठोड, रामराव जाधव, शंकर जाधव, बंडु राठोड, पंजाब चव्हाण यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.































































