
जम्मू-कश्मीरच्या हाजीपुर भागात हिंदुस्थानी सैन्याने दोन पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातलं. पाकिस्तानने नियंत्रण रेषेचं उल्लंघन करत गोळीबार केला. हिंदुस्थानी सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं आणि दोन पाकिस्तानी जवानांचा खात्मा केला. त्यानंतर आपल्या जवानांच्या मृतदेहांना घेऊन जाण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांनी पांढरं निशाण फडकवलं आणि मृतदेह घेऊन गेले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून पाकड्यांच्या या कृत्यांवर नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
हिंदुस्थानी प्रदेशावर सतत गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानची या घटनेमुळे नाचक्की होत आहे. कारण, यापूर्वीही पाकिस्तानी सैन्याने आपल्या मृत जवानांचे मृतदेह परत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हिंदुस्थानी सैन्याने त्यांना रोखून धरलं होतं. अखेर हिंदुस्थानी सैन्यापुढे नमतं घेत पाकिस्तानी सैन्याला पांढरं निशाण फडकवणं भाग पडलं आहे.
#WATCH Hajipur Sector: Indian Army killed two Pakistani soldiers in retaliation to unprovoked ceasefire violation by Pakistan. Pakistani soldiers retrieved the bodies of their killed personnel after showing white flag. (10.9.19/11.9.19) pic.twitter.com/1AOnGalNkO
— ANI (@ANI) September 14, 2019






















































