
आम आदमी पार्टीने पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभेसाठी 22 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत तीन महिलांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत ‘आप’ने हरयाणातील जननायक पार्टीशी आघाडी केली होती. आता मात्र दोन्ही पक्ष आमने-सामने येणार आहेत. आपने योगेश्वर शर्मा (पंचकुला), अंशलीकुमार आगरवाल, (अंबाला शहर), गुरदेव सिंग सुरा (पंचकुला), अनुप संधू (असंध), राजकुमार पेहल (जुलाना) यांची उमेदवारी जाहीर केली.

























































