1 / 6
‘बिग बॉस' 13 च्या नवीन घराचा सेट फिल्मसिटीमध्ये उभारण्यात आला असून त्याची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.
सलमानच्या सूत्रसंचालनाने सजलेला हा शो 29 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील या शोची थीम वेगळी असणार आहे.
18हजार 500 स्क्वेअर फूटाच्या जागेमध्ये हा सेट उभारण्यात आला असून यंदा या घराला संग्रहालयाचं स्वरुप देण्यात आलं आहे.
तीन जणांना एक बेड शेअर करावा लागणार आहे. विशेष म्हणजे यावेळी शक्यतो इको-फ्रेंडली वस्तूंचा वापर करुन हे घर सजविले आहे. प्लास्टिकचा वापर टाळला आहे.




























































