पालिका कर्मचाऱ्याची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

दादर पश्चिमेकडील मलनिस्सारण प्रचलन/उदंचन केंद्र येथे शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुणाने प्रशासकीय इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. मात्र आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही.

सुमित कुरळे (23) असे त्या तरुणाचे नाव होते. तो डोंबिवली येथील मानपाडा परिसरात राहत होता. नेहमीप्रमाणे तो आज सकाळी कामावर आला. पण अचानक सकाळी सवादहाच्या सुमारास त्याने प्रशासकीय इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून खाली उडी टाकली. याप्रकरणी दादर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.