राखीने शेअर केला नवऱ्याचा फोटो, सोबत चाहत्यांना दिला टास्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयटम गर्ल राखी सावंत हिने काही दिवसांपूर्वी लग्न केल्याचे जाहीर केले मात्र तिने अद्याप तिच्या पतीचा फोटो कुणालाही दाखवलेले नाही. फक्त तिने त्याचे नाव रितेश असून तो लंडनला राहत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे राखीचा नवरा कोण असेल हे पाहण्याची तिच्या चाहत्यांना फार उत्सुकता लागली आहे. त्यासाठीच राखीने इंस्टाग्रामवर तिच्या नवऱ्याचा फोटो शेअर केला आहे.


View this post on Instagram

Konsa Mera husband hai

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

मात्र एखादं काम सरळं सोपं करेल ती राखी सावंत कुठली. राखीने तिच्या नवऱ्याचा फोटो शेअर करतानाही त्य़ात एक ट्विस्ट टाकला आहे. राखीने तिच्या नवऱ्यासोबत आणखी काही तरुणांचे फोटो शेअर केले असून त्यातील तिचा नवरा कोण हे शोधण्याचा टास्क तिने चाहत्यांना दिला आहे.