बेस्टच्या इलेक्ट्रिक बसमधून धूर; प्रवाशांत घबराट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
best-bus

बेस्टच्या ताफ्यात नुकत्याच दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बसचे अचानक ब्रेक जाम  होऊन टायरजवळून धूर आल्याने ही बस तातडीने रिकामी करण्यात आल्याची घटना मुलुंड बस डेपोजवळ सोमवारी सकाळी  घडली. या घटनेत सुदैवाने कोणासही दुखापत झाली नसली तरी नव्याकोऱया बसच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बेस्टमध्ये भाडेतत्त्वावर नुकत्याच दाखल झालेल्या पहिल्या ताफ्यातील दहा इलेक्ट्रिक बसपैकी काळा किल्ला आगारातील मार्ग क्र.302 च्या राणी लक्ष्मीबाई चौक ते मुलुंडच्या राणा प्रताप चौक दरम्यान धावणाऱया इलेक्ट्रिक बसला मुलुंड डेपोतून बाहेर पडताना सकाळी 7.15 वाजता अचानक ब्रेक बाईडिंग होऊन टायरच्या  दिशेने धूर निघाल्याने वाहकाने तातडीने प्रवाशांना बाहेर काढले. चालकाने अग्निशमन उपकरणाच्या मदतीने तातडीने ब्रेक लायनर येथे लागलेली ही आग विझविली. या बसला तपासणीसाठी आगारात पाठविण्यात आले. त्यानंतर कंपनीच्या तज्ञांनी ही बस 11.30 वाजता तपासली. ब्रेक रिलीज करून ही बस धारावी डेपोत आणण्यात आली.

कंपनीचे स्पष्टीकरण
दरम्यान या घटनेनंतर कंपनीने स्पष्टीकरण देताना सांगितले की, उजव्या बाजू्या बुस्टरमध्ये एअर लिकेजमुळे आग लागली. कोणत्याही वाहनातील ही सामान्य घटना आहे. तरीही या घटनेमागील कारणांचा आम्ही शोध घेत आहोत.