
दापोली विधानसभा मतदारसंघात एकाचे नावाचे उमेदवार रिंगणात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय कदम यांच्या बरोबरच अपक्ष, संजय धोंडू कदम, संजय सीताराम कदम, संजय संभाजी कदम या तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे दापोलीत चार संजय कदम नावाचे उमेदवार आहेत.
विधानसभा २०१९ – महाराष्ट्रातील चुरशीच्या लढती, वाचा सविस्तर…
रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात छाननी नंतर 40 अर्ज वैध ठरले असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या 7 ऑक्टोबर हा शेवटचा दिवस असून उद्या अंतिम उमेदवार निश्चित होतील. काल झालेल्या उमेदवारी अर्ज छाननीत जिल्ह्यातील पाच मतदारसंघातून 40 अर्ज वैध ठरले.
त्यामध्ये दापोली विधानसभा मतदारसंघ-योगेश कदम -महायुती, प्रवीण मर्चंडे – बसप, संजय कदम – आघाडी, संतोष खोपकर – वंचित आघाडी, केदार साठे – अपक्ष, अनंत मोहिते अपक्ष, संजय धोंडू कदम, संजय सीताराम कदम, संजय संभाजी कदम, मुश्ताक मिरकर, योगेश दीपक कदम, विकास बटावले, विजय मोरे, सुवर्णा पाटील हे सर्व अपक्ष उमेदवार, गुहागर विधानसभा मतदारसंघ-भास्कर जाधव -महायुती, सहदेव बेटकर – आघाडी, उमेश पवार – बसप, गणेश कदम – मनसे , विकास जाधव – वंचित आघाडी, रामदास राणे – अपक्ष.चिपळूण विधानसभा मतदारसंघ-सदानंद चव्हाण – महायुती, शेखर निकम – आघाडी, सचिन मोहिते – बसप, तुषार खेतल – अपक्ष रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ-उदय सामंत – महायुती , सुदेश मयेकर – आघाडी, राजेश जाधव – बसप, दामोदर कांबळे – वंचित आघाडी, प्रदीप कचरे – बहुजन मुक्ती पार्टी , संदीप गावडे – अपक्ष.राजापूर विधानसभा मतदारसंघ- राजन साळवी-महायुती, अविनाश लाड -आघाडी, अविनाश सौंदळकर-मनसे, विलास खानविलकर हिंदी महासभा, महेंद्र पवार-बसप, संदीप ठुकरूल -कुणबी स्वराज्य पक्ष, मंदार राणे-अपक्ष, संतोष गांगण-अपक्ष, प्रसाद पाटोळे-अपक्ष, राज पाध्ये-अपक्ष हे उमेदवार आहेत.





























































