ICC कसोटी क्रमवारी, ‘नंबर वन’च्या रेसमध्ये विराटने स्मिथला गाठले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका संघात पुण्यात दुसरा कसोटी सामना खेळला गेला. या कसोटी लढतीत टीम इंडियाने आफ्रिकेवर डावाने विजय मिळवला. टीम इंडियाच्या विजयामध्ये कर्णधार विराटने नाबाद 254 धावा करत मोलाचे योगदान दिले. या खेळीच्या बळावर त्याने सामनावीरचा पुरस्कारही जिंकला. याचा फायदा त्याला आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही झाला आहे.

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या विराट कोहलीने पहिल्या स्थानावर असणाऱ्या स्टीव्ह स्मिथला गाठले आहे. दोघांमध्ये आता फक्त एका अंकाचे अंतर आहे. पहिल्या स्थानावर असणाऱ्या स्मिथकडे 937 अंक आहेत, तर विराट कोहलीचे आता 936 अंक झाले आहेत. आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत मोठी खेळी करून स्मिथकडून पहिले स्थान हिसकावण्याची नामी संधी विराटकडे आहे.

विराट सेनेचा ऐतिहासिक मालिका विजय! दुसऱया कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा चौथ्याच दिवशी धुव्वा

विराट कोहलीसह पहिल्या कसोटीत द्विशतक आणि दुसऱ्या कसोटीत शतक झळकावणारा मयांक अग्रवल टॉप 20 मध्ये पोहोचला आहे. मयांक अग्रवाल 17 व्या स्थानावर असून चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे अनुक्रमे चौथ्या आणि नवव्या स्थानावर आहेत.

गोलंदीजीमध्ये आर. अश्विनला तीन स्थानांचा फायदा झाला असून तो सातव्या स्थानावर पोहोचला आहे, तर जसप्रित बुमराह तिसऱ्या स्थानावर कायम आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जेसन होल्डर पहिल्या आणि जाडेजा दुसऱ्या स्थानावर आहे, तर अश्विन पाचव्या स्थानावर आहे.