
वाढते कर्ज आणि घटते उत्पन्न यामुळे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी बीएसएनएलला झगडावे लागत आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तरीही भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी दूरसंचार कंपनीच्या कर्मचाऱयांचा अद्याप सप्टेंबर महिन्याचा पगार झालेला नाही.
त्यामुळे रखडलेला पगार दिवाळीपूर्वी मिळावा या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी उपोषण करण्याचा इशारा युनियनच्या वतीने देण्यात आला आहे. परंतु दिवाळीपूर्वीच कर्मचाऱयांचा रखडलेला पगार देऊ, असे आश्वासन बीएसएनएलच्या वतीने देण्यात आले आहे.



























































