पाहा हरमनप्रीत कौरने घेतलेला हा अप्रतिम झेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. हिंदुस्थान महिला संघाने टी-20 मालिकेत जे घवघवीत यश मिळले आहे त्यात हरमनप्रीतचा मोठा वाटा आहे. आपल्या धडाकेबाज कामगीरीमुळे जगात हरमनप्रीतच्या चाहत्यांची संख्या खूपच आहे. हरमनप्रीतच्या उत्तर क्षेत्ररक्षणाचे एक ताजे उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

सध्या हिंदुस्थानचा महिला संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. तिथे गुरुवारी व्हीव्हीयन रिचर्ड्स स्टेडियममध्ये हिंदुस्थान विरुद्ध वेस्ट इंडिज सामना खेळविण्यात आला. या सामन्या दरम्यान हरमनप्रीत बाऊंड्री रेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होती. वेस्ट इंडीजची कर्णधार स्टेफाइन टेलर ही फलंदाजी करत असताना तिने षटकार खेळण्यासाठी चेंडू टोलावला. मात्र हरमनप्रीतने उंच उडीत घेत एका हाताने झेल घेतला व टेलरच्या सर्व आकांक्षावर पाणी फेरले. तिच्या या अफलातून कामगिरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहते तिचे कौतुक करत आहेत.