शाळेत असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार, गायिकेचा अनू मलिकवर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या वर्षी आलेल्या #metoo या वादळाने हिंदुस्थानात चांगलीच खळबळ माजवली होती. लैंगिक शोषणाविरुद्धच्या या कँम्पेनची सुरुवात जागतिक पातळीवर झाली होती. हिंदुस्थानात याबाबत उघड वाच्यता करण्याचं धाडस अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केलं होतं.

#MeToo अनू मलिक विकृत, दोन गायिकांनी केला लैंगिक अत्याचाराचा आरोप

कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ ही एक गंभीर बाब आहे. या बाबीकडे दुर्लक्ष न करता त्याविषयी उघडपणे आणि धाडसाने पुढे येऊन बोलणे गरजेचे आहे, ही जागृती #metoo या मोहिमेमुळे अनेक महिलांमध्ये आली होती. या मोहिमेमुळे कलाकार, तंत्रज्ञ, संगीतकार, पत्रकार, दिग्दर्शक अशा अनेक क्षेत्रांमधील स्त्रियांवर झालेल्या अन्यायाला वाचा फुटली होती.

या गायिकेने अनू मलिकला म्हटले ‘गटारातला उंदीर’

या यादीत आता अजून एका गायिकेची भर पडली आहे. हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गायिका श्वेता पंडित हिने संगीतकार अनु मलिक याच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. तिने एका ट्वीटच्या माध्यमातून हे आरोप केले आहेत. आजच्या जगातही लोकं अशा प्रकरणांमध्ये आम्हालाच प्रश्न विचारतात. मग मी जेव्हा 15 वर्षांची होते, तेव्हा काय झालं होतं, ते सांगितलं तर काय होईल?, असं ट्वीट केलं आहे. हे ट्वीट तिने अनु याच्यावर लैंगिक छळाचे आरोप करणाऱ्या नेहा भसिन हिला रिट्वीट करताना केलं आहे. नेहा भसिन हिनेही अनु मलिकवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

अन्नू मलिकची ‘इंडियन आयडॉल’मधून हकालपट्टी