या गायिकेने अनू मलिकला म्हटले ‘गटारातला उंदीर’

#MeToo या मोहिमेअंतर्गत काही महिन्यांपूर्वी बॉलीवुडमधील अनेक नामवंत व्यक्तींवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. यात प्रसिद्ध संगीतकार अनु मलिक यांचेही नाव होते. या आरोपांनंतर मलिक यांना ‘इंडियन आयडल’ या रिअॅलिटी शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. पण आता अनु मलिक याच शोमध्ये कमबॅक करत आहेत. त्यांचे हे कमबॅक गायिका सोना मोहपात्राला खटकले असून तिने मलिक यांना गटारातला उंदीर परत येतोय असे म्हटले आहे. सोनाच्या या विधानावर मलिक काय म्हणतात याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

मलिक यांचे शोमध्ये परत येणं सोनाला अपमानास्पद वाटतं आहे. तिने ट्वीटमधून आपला रोष व्यक्त केला आहे. ‘अनेक आरोपींचे पुनर्वसन, सोनी टीव्हीने एक वर्षाच्या आत अनु मलिकला पुन्हा इंडियन आयडल’मध्ये आमंत्रित करून अशा व्यक्तींच्या थोबाडीत मारली आहे जे आपल्या मुलांसाठी सुरक्षित भविष्याची अपेक्षा बाळगून आहेत. #RatReturnsToTheGutter उंदीर पुन्हा गटारात येत आहे’, असे टि्वट सोनाने केले आहे.

sona

मलिक यांच्यावर सोना बरोबरच श्वेता पंडित हिने देखील लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. काम देण्याच्या मोबदल्यात मलिक यांनी आपल्याकडून किस मागितला होता. त्यावेळी मी फक्त 15 वर्षांची होती आणि शाळेत जात होती. ही घटना 2001 साली घडली होती. मलिक यांनी मला अंधेरीतील एम्पायर स्टुडीओमध्ये बोलावले होते. तिथे संगीताशिवाय गाणं गाण्यास त्यांनी सांगितले. त्यावेळी मी ‘हर दिल जो प्यार करेगा’ हे गाणं म्हटलं. त्यानंतर मलिक यांनी मला सुनिधी आणि शानबरोबर गाण गाण्याची संधी देईन पण त्यासाठी मला किस करावं लागेल अशी मागणी केली. हे ऐकून मला धक्काच बसला. मी त्यांना काका म्हणायचे. ते माझ्या वडिलांना भाऊ समजायचे. पण कोणी आपल्या भावाच्या मुलीकडे अशी मागणी करू शकतो का, असा सवालही श्वेताने केला होता. तो माझ्या आयुष्यातला सर्वाधिक वाईट काळ  होता. त्यानंतर अनेक महिने मी तणावात होते असेही श्वेताने सांगितले होते.

आपली प्रतिक्रिया द्या