बीडमध्ये पाचशे फुट दरीत कोसळली जीप, दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कपिलधार तालुक्यातील मांजरसुंबा येथून कपिलधारकडे जात असलेली एक जीप जवळपास पाचशे फुट खोल दरीत कोसळली. जीपमधील दोन जण ठार तर दोघे जखमी झाले आहेत.

बीड तालुक्यातील कपिलधारकडे एका जीपमध्ये बीड शहरातील शाहू नगर भागातील चौघेजण जात होते. मांजरसुंबा रोडकडून कपिलधारकडे जात असताना जीप थेट समोर असलेल्या दरीत गेली. ही घटना जवळपास थांबलेल्या महिलांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे इतरांनाही हा प्रकार लक्षात आला.

कपिलधार पाहण्यासाठी गेलेल्या तरुणांनी जीपमधील जखमींना बाहेर काढले. त्या ठिकाणी मोबाईला रेंज नसल्यामुळे पोलिस व रुग्णालयाशी तात्काळ संपर्क होऊ शकला नाही. मांजरसुंबा घाटावर येऊन या अपघाताची माहिती पोलिसांना कळवली. अ‍ॅम्ब्युलन्स आल्यानंतर सर्वांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. चौघापैकी हरिष कांबळे व सचिन  सुरवसे यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले. तर धर्मराज वीर व संतोष काळे यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, सदरील अपघाताची माहिती मृतांचे कुटूंबीय व नातेवाईंकाना ही घटना कळाताच त्यांनी जिल्हा रुग्णालयातकडे धाव घेतली.