#INDvBAN धोनी मैदानावर पुन्हा येतोय, फलंदाज म्हणून नाही तर …

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकापासून टीम इंडियाचा ‘बेस्ट फिनिशर’ महेंद्रसिंह धोनी क्रिकेटच्या मैदानावरून गायब झाला आहे. वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि आता बांगलादेशविरुद्ध होत असलेल्या मालिकेमध्ये धोनी मैदानावर दिसला नाही. परंतु धोनी पुन्हा एकदा पुनरागमन करण्यासाठी सज्ज होतोय. 38 वर्षीय धोनी मैदानावर पुन्हा येतोय, परंतु फलंदाज म्हणून नाही तर तो एका नवीन भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

38 वर्षीय धोनी विश्वचषकाच सेमी फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर मैदानावर पाऊल ठेवलेले नाही. कसोटी क्रिकेटमधून यापूर्वीच सन्यास घेतलेला धोनी एका नव्या रुपात दिसणार आहे. कोलकातामध्ये बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटीदरम्यान धोनी समालोचकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

…अन् सौरव गांगुलीने मानले आभार

विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा संघ 22 नोव्हेंबरला बांगलादेशशी भिडणार आहे. टीम इंडिया पहिल्यांदाच ‘डे नाईट कसोटी’ खेळणार आहे. याच कसोटीमध्ये धोनी नवीन भूमिकेसह पुनरागमन करणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, कोलकाता कसोटीचे प्रसारण करणाऱ्या वाहिनीने धोनीला ‘पाहुणा समालोचक’ म्हणून सहभागी करून घेण्याची योजना आखली आहे.


View this post on Instagram

A little help always goes a long way specially when u realise it’s a big vehicle

A post shared by M S Dhoni (@mahi7781) on

गुलाबी चेंडूद्वारे खेळण्यासाठी मैदानात उतरणाऱ्या टीम इंडियासाठी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली नवीन योजना आणणार आहे. रिपोर्टनुसार कसोटी सामन्याच्या पहिल्या दोन दिवस हिंदुस्थानचे सर्व माजी क्रिकेटपटूंना आपल्या कारकीर्दीतील काही खास क्षण प्रेक्षकांना ऐकवण्यासाठी बोलावले जाणार आहे. असे झाले तर धोनी पहिल्यांदाच समालोचकाच्या भूमिकेत दिसेल.