अर्थव्यवस्था रुळावर न आणल्यास जनता धडा शिकवेल!- शरद पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अर्थव्यवस्थेतील चुकीच्या धोरणांमुळे देशातील एक कोटी 50 लाख व्यक्तींनी रोजगार गमावले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील कृषी, मोटार उद्योग, लघु उद्योग व बांधकाम क्षेत्राला फटका बसला आहे. देशातील बिघडत असलेली अर्थव्यवस्था लवकर रुळावर न आणल्यास जनता धडा शिकवेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी दिला.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसिद्धीमाध्यमांना निवेदन दिले. त्यात देशातील आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण केले आहे. यामध्ये त्यात देशाच्या आर्थिक स्थितीविषयी मोठी चिंता व्यक्त केली आहे.  2015मध्ये मोदींचे सरकार सत्तेत आल्याच्या पहिल्या वर्षी शेतकऱयांच्या आत्महत्यांचा दर 39 टकक्यांवर गेला. त्यानंतर सहा वर्षांत देशात 15,000 शेतकऱयांनी आपले जीवन संपवले. नोटाबंदीने सहकारी पतपुरवठा पद्धती कोसळली असून यंदा पहिल्या त्रैमासिक काळात कृषी विकास दर 2 टक्के इतका  नीचांकी घसरल्याचे नमूद केले आहे.

दीड कोटी लोकांचा रोजगार बुडाला

अर्थव्यवस्थेतील चुकीच्या धोरणांमुळे देशातील एक कोटी 50 लाख व्यक्तींनी रोजगार गमावले असून 2015 मध्ये बेरोजगारीचा 5 टक्के असलेला दर 2017 मध्ये 16 टक्क्यांवर गेला होता. सीएमआयईच्या नोंदीनुसार देशातील सध्याचा बेरोजगारीचा दर 8.4 टक्के असून मेट्रो शहरातील बेरोजगारीचा दर 9.4 टक्के असल्याचे पवार यांनी प्रसिद्धीमाध्यमांना सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे.