नगर- देहरे येथे एकाच कुटुंबातील 14 जणांना अन्नातून विषबाधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर-मनमाड महामार्गावरील नगरतालुक्यातील देहरे येथील एका कुटुंबातील 14 जणांना अन्नातून विषबाधा झाली. जुनी बाजरी व पावसामुळे उबलेली बाजरी एकत्रित दळून आणून त्याच्या भाकरी करून खाल्ल्याने विषबाधा झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यातील एकाची प्रकृती नाजूक आहे.

ही घटना शुक्रवारी घडली. या सर्वांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी विवाह सोहळा पार पडला. त्यामुळे शुक्रवारी नवरदेव-नवरी देव दर्शनासाठी गेले होते. त्यामुळे ते या घटनेतून बचावले. ललिता अतुल वाघ (25), राहुल रमेश माळी (25), सुनीता राहुल माळी (22), सुनिता रमेश माळी, जनाबाई शंकर माळी (वय -70), सुरज रोहिदास पवार (20), पूजा भास्कर वाघ (14), उषा भास्कर वाघ (15), कार्तिक सुरज पवार (2), सुदर्शन अरुण वाघ (2), धीरज रमेश माळी (20) या 11 जणांना विषबाधा झाली आहे. त्यातील धीरज माळी याची प्रकृती चिंताचनक असल्याचे समजते.