ऍड. संजीव पुनाळेकर, विक्रम भावेविरोधात दोषारोपपत्र दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी ऍड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेविरोधात बुधवारी येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

भावेविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी सीबीआयला 90 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. ती मुदत 21 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वी दोषारोपपत्र दाखल न केल्यास भावेला जामीन मिळण्याची शक्यता होती. त्यामुळे सीबीआयने एक दिवस आधीच दोषारोपपत्र दाखल केले. भावे याचा जामीन अर्ज यापूर्वी न्यायालयाने फेटाळला आहे तर वकील संजीव पुनाळेकर यांना यापूर्वीच जामीन देण्यात आला आहे. ऍड. पुनाळेकर यांनी दाभोलकर प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याला गुह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार कळसकर याने ठाणे येथील खाडी पुलावरून शस्त्राचे तुकडे करून फेकून दिले तर भावे याने घटनास्थळाची रेकी करण्यास मदत केली असा दावा सीबीआयने केला आहे.