सहा महिने वापरात नसलेले ट्विटर अकाऊंट बंद होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ट्विटरने आपल्या पोर्टलकरून सक्रिय नसलेले अनेक अकाऊंटस् बंद करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून साइन इन न केलेले अकाऊंटस् ट्विटर बंद करणार आहे.

या सोबतच इनऑक्टिक्ह युजर्सना सूचना देणारा ई-मेलही ट्विटरकडून पाठवण्यात येत आहे. युजर्सनी 11 डिसेंबरपर्यंत साइन इन न केल्यास ते त्यांचे अकाऊंट बंद केले जाईल. बंद केलेल्या अकाऊंटचे युजर नेम दुसऱयांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासंदर्भात ट्विटरच्या प्रवक्त्यांनी सांगितले, इनऑक्टिक्ह युजर्सचे अकाऊंटस् बंद करण्याकर काम सुरू आहे. यामुळे युजर्सना अचूक, विश्वासार्ह माहिती मिळेल आणि ट्विटरवरील त्यांचा विश्वास वाढेल. ट्विटरने इनऑक्टिक्ह युजर्सना सूचना देणारे ई-मेल पाठवण्यास सुरुवात केलीय, पण हे ती अकाऊंट बंद करण्याची तारीख जाहीर केलेली नाही. अकाऊंटस् बंद करण्याची प्रक्रिया फक्त एका दिवसात नाही तर काही महिन्यांमध्ये पूर्ण होईल, असे ट्विटरने म्हटले आहे. युजर्सच्या सुकविधेसाठी ट्विटर 2020 मध्ये नवीन फिचर्स आणणार आहे. ‘रिट्विट’ आणि ‘मेन्शन्स’करील फिचर्स आणखी विकसित केले जाणार आहेत.