माँसाहेब आणि बाळासाहेब आज तुमची खूप आठवण येतेय, सुप्रिया सुळे यांचे भावुक ट्विट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब, आज तुमची खूप आठवण येतेय. हे सर्व पाहायला तुम्ही दोघे असायला हवे होतात. तुम्हा दोघांनी मला मुलीपेक्षाही जास्त प्रेम दिले. तुम्ही माझ्या आयुष्यात स्पेशल होता, आहात आणि राहाल असे भावुक ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ठाकरे कुटुंबीयांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर ठाकरे कुटुंबातील व्यक्ती प्रथमच विराजमान होत असल्याबद्दल राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी आनंद व्यक्त केला. आजचा सूर्योदय एका नवा इतिहास रचतोय. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यात येत आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. देशात महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतिपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करू. अभिनंदन, असे आणखी एक ट्विट करत त्यांनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या.