लतादीदींची प्रकृती उत्तम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती उत्तम आहे. गेल्या तीन आठवडय़ांपासून त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लतादीदींना आता आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये नेण्यात आले आहे.

लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास आणि न्यूमोनियामुळे 11 नोव्हेंबर रोजी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर  ठेवले होते. त्यामुळे जगभरातील त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. दीदींवर डॉ. प्रतीत समधानी उपचार करीत आहेत. लतादीदी उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत.  त्यांना आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये नेण्यात आल्याची माहिती त्यांची भाची रचना खडीकर-शहा यांनी दिली. चाहत्यांच्या सदिच्छा आणि प्रार्थना फळाला आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाचे आभार मानायचे आहे, असे शहा यांनी सांगितले. दीदींच्या डिस्चार्जबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.