
सध्या जुन्या गाण्यांचे रिमिक्स बनवने हा ट्रेंड सुरू झाला आहे. यावर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे. नवे संगीतकार जुन्या गाण्यांची तोडमोड करून त्यांचे रिमिक्स बनवतात असे अशा भोसले म्हणाल्या आहेत. तसेच नवीन संगीतकारांना फार डोकं नाही असेही आशाताई म्हणाल्या आहेत.
बॉम्बे टाईम्स या वृत्तपत्राला अशाताईंनी मुलाखत दिली आहे. त्यात आशाताई म्हणाल्या की, नवीन संगीतकार नवीन गाणी नाही का बनवू शकत? बहुतांश संगीतकार जुन्या गाण्यांची तोड मोड करून त्यांचे रिमिक्स बनवतात. बरं रिमिक्स केल्यावरही ती गाणी चांगली होत नाहीत. चुरा लिया, हंगामा हो गया, ये मेरा दिल अशा गाण्यांचे पण रिमिक्स झाले होते. परंतु ज्यांनी कोणी ही गाणी रिमिक्स केले त्यांच्याकडे गळा होता आणि डोकंही होतं. हल्लीच्या रिमिक्स बनवण्यार्या संगीतकारांकडे ना गळा आहे ना डोकं.” तसेच पूर्वी लोक खूप रियाझ करायचे खूप मेहनत करायचे. हल्ली कोणाकडेच धीर नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.



























































