#GOODBYE2019 – या दुर्घटनांनी संपूर्ण देश हादरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसाम उत्तर प्रदेश विषारी दारू –

aasam-poisoning-1
फेब्रुवारी महिन्यात आसामच्या गोलाघाट आणि जोरहाट या जिल्ह्यात विषारी दारूमुळे मृत्यूने तांडव घातले होते. 168 जणांचा मृत्यू झाला होता. त्याआधी उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्येही विषारी दारू प्यायल्याने 100 जणांचा मृत्यू झाला होता.

बिहारमध्ये मेंदूज्वराचा हाहाकार – 

bihar-tragedy

जून महिन्यात बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये श्रीकृष्ण इस्पितळात मेंदूज्वराने आतापर्यंत 160 बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता.

तिवरे धरण दुर्घटना – 

tiware-dam4
2 जुलै 2019 च्या रात्री रत्नागिरीतील तिवरे धरण फुटले. या धरणाचे पाणी गावात शिरल्याने तब्बल 19 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण अद्याप बेपत्ता आहेत. धरण फुटल्यामुळे धरणालगतच्या गावात पाणी शिरून अनेक संसार उध्वस्त झाले.

दिल्लीत घडलेल्या आगीच्या भयंकर घटना – 

delhi-fire

8 डिसेंबर 2019 ला दिल्लीतील अनाज मंडी भागात एका इमारतीला लागलेल्या आगीत 43 जणांचा मृत्यू झाला तर 50 हून अधिक जण जखमी झाले होते. फेब्रुवारी महिन्यात दिल्लीतील हॉटेलला लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू झाला होता.

कुल्लूतील भयंकर बस अपघात – 

kullu-tiware-bus-stand

20 जून 2019 ला कुलूमध्ये एक प्रवासी बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 44 जणांचा मृत्यू झाला होता तर 34 जण जखमी झाले होते. 

सुरत कोचिंग क्लास आग –

surat-fire1
सुरतमधील कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 22 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. आगीपासून वाचण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांनी चौथ्या माळ्यावरून उड्या घेतल्या होत्या.

मालाड भिंत पडून झालेली दुर्घटना

malad-wall-collapse
मालाड पिंपरीपाडा येथे जलाशयाची संरक्षक भिंत कोसळून तब्बल 26 जणांचा मृत्यू झाला. 12 झोपडय़ांवर भलीमोठी भिंत कोसळल्याने ही भयंकर दुर्घटना घडली होती. मृतांमध्ये एक वर्षाच्या मुलीचाही समावेश होता.