
सध्या सुर्याचे कंकणाकृती ग्रहण बघण्यासाठी लोक घराबाहेर पडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हे सुर्यग्रहण पाहिले. त्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. मोदींच्या एका फोटोअवर एका ट्विटर युजरने हा तुमचा फोटो मीम होईल असे म्हटले आहे. त्यावर मोदींनी त्याला धन्यवाद म्हटले आहे.
Most welcome….enjoy 🙂 https://t.co/uSFlDp0Ogm
— Narendra Modi (@narendramodi) December 26, 2019
अक्षय कुमारल्या दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी मीम बनवणार्यांची प्रशंसा केली होती. ही त्यांची क्रिएटीव्हिटी असल्याचे त्यांनी सांगितले होते. आता त्यांच्या एका फोटोवर एका ट्विटर युसरने तुमच्या फोटोचा मीम होणार असे म्हटले आहे. त्याला रिप्लाय करत मोदींनी मोस्ट वेलकम आणि एन्जॉय म्हणून रीट्विट केले आहे.



























































