
मालवण समुद्रात पॅरासेलिंग सफर करण्यासाठी निघालेल्या अझर अन्सारी (वय 32) या तरुणाचा बोटीतून समुद्रात पडल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. साकिनाका मुंबई येथून अझर व ईनाबी हे पती पत्नी मालवण येथे पर्यटनासाठी आले होते. मालवण दांडी बीच येथून हे दोघे बोटीतून पॅरासेलिंगसाठी समुद्रात गेले होते. यावेळी अझर हे समुद्रात पडले. त्यांना पर्यटन व्यवसाईकानी तात्काळ समुद्रा बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी अझर यांचा मृत्यू झाला. या अपघात प्रसंगी पोलिसात माहिती देण्यात आली असून पोलीस याबाबत अधिक चौकशी करत आहे. तर मृतदेह शवविच्छेदन साठी मालवण ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.































































