
परळी मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे नवनिर्वाचित सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा परळीत नागरी सत्कार सोहळा शुक्रवार 10 जानेवारी रोजी होणार आहे. यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक आमदार, जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांसह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा गौरव करण्यात येणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी शहरात सुरू करण्यात आली आहे.
धनंजय मुंडे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा 30000 हुन अधिक मतांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाबद्दल हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. नागरी सत्कार सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून महाविकास आघाडीचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या नागरी सत्कार सोहळ्याला तसेच भव्य विजयी मिरवणुकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नागरी सत्कार सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



























































