
जेएनयूमधील हल्ल्याविरोधातील आंदोलनादरम्यान ‘फ्री कश्मीर’चे बॅनर कोणी तयार केले याची चौकशी करण्यात येत आहे. मेहकच्या हाती हे बॅनर कसे आले याचाही तपास पोलीस घेत आहेत. मेहकच्या प्राथमिक जबानीत तिने फ्री कश्मीरचा बॅनर झळकवण्यामागे सध्या कश्मीरमध्ये असलेली परिस्थिती जबाबदार असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र तरीही याविषयीचा अधिक तपास पोलीस करीत आहेत असे अनिल देशमुख म्हणाले.





























































