
रोज नवनवीन तंत्रज्ञान उदयाला येत आहे. आपण हे तंत्रज्ञान आत्मसात केले नाही तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावेच लागतील. त्यामुळे आजच्या तरुणाईला तंत्रज्ञानाची सखोल माहिती असणे गरजेचे असल्याचे मत प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले. ‘युवक महोत्सव युवारंग’चे उद्घाटन काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी हे मत मांडले.
डॉ. काकोडकर म्हणाले की, चांगले वाईटचे आकलन असल्यास उच्च जीवनमूल्ये आपणांस जोपासता येतील. जगात हिंदुस्थानला सक्षम करायाचे असेल तर शहरी आणि ग्रामीण भागाची दरी मिटविण्या बरोबर ज्ञान, कला आणि निर्मिती या त्रीसूत्री रंगावर भर देणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी संस्थेचे मानद सचिव कमलताई पाटील, संस्थेचे संचालक रमाकांत पाटील, युवारंगाचे कार्याध्यक्ष दीपक बंडू पाटील, प्रा. मोहन पावरा, डॉ. सत्यजीत साळवे, प्र. कुलगुरु प्रा. पी. पी. माहूलीकर, प्र. कुलगुरु पवार, प्रा. नितीन बारी, अधिष्ठाता ए. बी. चौधरी, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, हैदरअली नुरानी, प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील, पोलीस उप विभागीय अधिकारी पुंडलिक सपकाळे, पो. नि. किसन नजनपाटील, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. सत्यजीत साळवे यांनी केले तर सुत्रसंचलन डॉ. विजयप्रकाश शर्मा यांनी केले. आभार युवारंग समन्वयक उपप्राचार्य एम. के. पटेल यांनी मानले.
संशोधन वृत्ती जोपासा
स्वातंत्र्य काळानंतर देशाने झपाट्याने प्रगती केली. आर्थिक बाबतीतही देश जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आर्थिक सबलिकरणात युवाशक्तीचा मोठा सहभाग आहे. आपला येथील दर्जा महत्वाची भूमिका बजावतो. प्रत्येकाचे जिवनस्तर जगात तिसऱ्या क्रमांकावर निर्माण करण्याची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे. हयात आपण जगात फार खाली आहोत त्यासाठी जिवनस्तर वाढविण्याची गरज आहे. हा स्तर आपल्या येथील मूल्य निर्मितीवर काढणार आहे. हिंदुस्थानातील निर्यात होणाऱ्या आणि आयात करणाऱ्या दहाची यादी तयार करावी यातून आपल्याला मूल्य निर्मितीचे वैशिष्ट्ये समजतील. भारतातील लोह खनिज अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती जोपासली पाहिजे. गुगलचा वापर करीत सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा. असे डॉ. काकोडकर यांनी सांगितले.


























































