
कचरामुक्त वरळीसाठी ‘इलेक्ट्रिक ट्रायसिकल’च्या माध्यमातून जनजागृती केली जाणार असून ओला आणि सुका कचरा वेगवेगळय़ा ठिकाणी जमा केला जाणार आहे. पालिकेच्या सहकार्याने ‘जी फाइव्ह ए’ संघटना, स्त्रीमुक्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन शनिवारी महापौर किशोरी पेडणेकर, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या उपक्रमात वरळी कोळीवाडा विभागात 20 ठिकाणी ओला आणि सुक्या कचऱयासाठी डस्टबिन ठेवण्यात आले आहेत. शिवाय ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती आणि सुक्या कचऱयाच्या विल्हेवाटीसाठी दोन ट्रक्टरची व्यवस्थाही करण्यात आली आहे. आयडीएफसी बँक सीएसआर फंडातून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती नगरसेविका हेमांगी वरळीकर यांनी दिली.

























































