
रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असून डोंबिवलीत तर कहर झाला आहे. रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याच्या रागातून चालकांनी एका दुचाकीस्वार तरुणावर क्षुल्लक कारणाकरून डोंबिकलीत तिघा रिक्षाचालकांनी चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. प्रतीक गावडे असे या तरुणाचे नाव असून त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान हल्लेखोर रिक्षाचालक पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
डोंबिवली पूर्वेकडील शेलारनाका येथे रात्री 12 काजण्याच्या सुमारास रमेश झांगऱया, चंद्या जमादार आणि रवी लगाडे या तीन चालकांनी दाकडी गावाजवळ रस्त्याच्या मध्ये रिक्षा उभ्या केल्या होत्या. यावेळी दुचाकीस्वार प्रतीक गावडे याने वाहतुकीला अडथळा होत असल्याने रिक्षा बाजूला घेण्याची विनंती केली. यावर आम्हाला रिक्षा बाजूला घेण्यास सांगण्याची तुझी हिंमत कशी झाली, असे म्हणत तिघा उद्दाम रिक्षाचालकांनी प्रतीक याला बेदम मारहाण करून त्याला चाकूने भोसकले.
नीलेश भुणे आणि बाली जयस्वाल यांनी प्रतीकला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र झटापटीत चाकूचा घाक कर्मी बसल्याने प्रतीकचा जागीच मृत्यू झाला. यावेळी रिक्षाचालकांनी नीलेश आणि बाली यांनाही गंभीर जखमी केले. रामनगर पोलीस ठाण्याचे पथक मारेकऱयांचा शोध घेत आहेत. डोंबिवलीत रिक्षाचालकांच्या दादागिरीमुळे प्रवासी आधीच वैतागले असताना आता त्यांची मजल हल्ला करण्यापर्यंत गेली असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

































































