किंग्ज सर्कल पादचारी पूल आठ महिन्यांनंतर खुला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

किंग्ज सर्कलचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील पादचारी पूल आठ महिन्यांच्या दुरुस्तीनंतर आजपासून पुन्हा खुला करण्यात आला आहे. जून 2019 मध्ये हा पूल मोठय़ा दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र आता हा पूल खुला केल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

पालिकेने 2014 साली केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार ‘डी. डी. देसाई ऑडिटर’कडून या पुलाची किरकोळ दुरुस्ती सुचवण्यात आली होती. मात्र गेल्या वर्षी छत्रपती शिकाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळल्यानंतर सर्क पुलांचे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यानुसार एका पुलाची मोठी दुरुस्ती तर दुसऱया पादचारी पुलाची पुनर्बांधणी करण्याची शिफारस करण्यात आली होती. दरम्यान, जून 2019 मध्ये किंग्ज सर्कल येथील दोन्ही पादचारी पूल बंद केल्यामुळे हजारो प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत होती. मात्र आता हा दक्षिणेकडील पूल सुरू झाल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. हा पूल सुरू झाल्यामुळे गांधी मार्केट, जीटीबी नगर या परिसरातील नागरिक तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची होणारी पायपीट आता थांबणार आहे.