सुवर्ण मंदिरात ‘टिक-टॉक’वर बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात टिक-टॉक व्हिडीओवर बंदी घालण्याची नोटीस लावण्यात आली आहे. सुवर्ण मंदिर हे धार्मिक स्थळ असून मंदिर परिसरात सेल्फी घेणे आणि टिक-टॉकवर व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर अपलोड करण्याचे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार न थांबल्यास भविष्यात मंदिरात मोबाईल बंदीचाही विचार केला जाणार आहे.

श्रीहरमंदिर साहिबचे सचिव जसविंदर सिंह यांनी याविषयीची माहिती देताना सांगितले, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने (एसजीपीसी) टिक-टॉक बंदीची पत्रके मंदिर परिसरात लावली आहेत. भक्त मंदिर परिसरात सेल्फी घेणे आणि टिक-टॉक व्हिडीओ बनविणे सुरूच ठेवणार असतील तर आम्हाला मंदिरात मोबाईल बंदीही करावी लागेल.

दरम्यान, सुवर्ण मंदिरात तीन मुलींनी एका पंजाबी गाण्यावर काढलेला टिक-टॉक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यानंतर दोन दिवसांतच कमिटीने मंदिरात टिक-टॉकवर बंदी घातली आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात तक्रारदेखील दाखल करण्यात आली असून असे प्रकार वारंवार मंदिर परिसरात सुरू आहेत.