प्रशासकीय अभ्यासासाठी ‘लेह’ची टीम नगरमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत याचा कारभार कसा चालतो याची माहिती घेण्यासाठी लेह- लडाख कारगील येथील कौन्सील टीम नगर येथे चार दिवसापासून दाखल झाली आहे. हिवरे बाजार, रायगड सिद्धी यासह जिल्ह्यातील विविध पंचायत समिती ग्रामपंचायत यांना या टीमने भेट दिली आहे. नगर जिल्ह्यामध्ये जलसंधारणाची कामे खूपच चांगल्या पद्धतीने केलेले असून त्याचा आम्हाला आमच्या राज्यात कशा पद्धतीने उपयोग करून घेता येतो असे एक टीम मधल्या सदस्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले यांची देखील या टीमने भेट घेतली व स्थानिक पातळीवरच्या कामाबद्दल या टीमने माहिती घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त आयुक्त जगन्नाथ भोर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, डॉक्टर सुनील तुंबारे, आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ तसेच पंचायत राज व्यवस्था ही सर्वत्र चांगल्या पद्धतीने आहे. स्थानिक पातळीवर कशा पद्धतीने कामकाज चालते , याची माहिती घेण्यासाठी लेह तसेच कारगिल येथील लढा ऑटोनॉमस हेल डेव्हलपमेंट कौन्सिल सदस्यांची टीम नगर येथे गेल्या चार दिवसापासून दाखल झालेली आहे. या टीममध्ये लेहमधील सात, कारगिलमधील 5 अशा बारा सदस्यांचं तीन अधिकारी आहेत. त्यांनी आदर्श हिवरेबाजार राळेगण-सिद्धी यांच्यासह विविध ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात माहिती घेतली. तसेच ग्रामीण भागांमध्ये ग्रामपंचायतीचे कार्य कशा पद्धतीने चालते, त्या ठिकाणी काय काय सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत, याची सुद्धा माहिती घेतली आहे. तर दुसरीकडे पंचायत समितीच्या मार्फत कोणकोणत्या योजना कशा पद्धतीने राबवले जातात, त्याची आखणी कशा प्रकारे केली जाते, याची सविस्तर माहिती घेतली आहे. यासंदर्भात कौन्सिल टीमच्या सर्व सदस्यांनी आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी स्थानिक पातळीवरच्या योजना संदर्भात तसेच कामकाजाबद्दल चर्चा केली. तसेच कारगिल या ठिकाणी कामकाज कशा पद्धतीने आम्ही चालवतो ,याबद्दलची माहिती दिलेली आहे. त्या ठिकाणीसुद्धा थ्री टायर सिस्टीम आहे. मात्र कौन्सिलकडे अधिकार कशा पद्धतीने वापरायचे याबद्दलच या पाहणी दौऱ्यातून अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून आम्हाला इथल्या प्रशासनाचा वेगळा अनुभव पाहायला मिळाला आहे, असे त्यांनी यावेळी झालेल्या चर्चेमध्ये सांगितले.

याबाबत टीमचे डेपोटी चेअरमन संदूप यांनी सांगितले की, ‘नगर जिल्ह्यामध्ये जलसंधारणाची कामे असतील, आरोग्याच्या राबवल्या जाणाऱ्या योजना असतील , जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, या खूपच चांगल्या पद्धतीने आहेत . येथील प्रशासनाची सिस्टिम अतिशय चांगली असून गेल्या चार दिवसांमध्ये त्याचा अनुभव आम्ही घेत आहोत. याबाबतचा अहवाल आम्ही तयार करून तो केंद्र सरकारला सादर करणार आहोत. लेह लडाखमध्ये चांगल्या प्रशासकीय योजना कशा पद्धतीने राबवता येईल हे आम्हाला नगरमधून शिकता आले, असं संदूप यांचं म्हणणं आहे.