मास्क लावून सोनसाखळी चोरणारा चोरटा गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनापासून रक्षण करण्यासाठी नागरिक मास्क लावत असून एका चोरानेदेखील सोनसाखळी चोरण्यासाठी मास्कचा वापर करून त्याचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रतीक्षा नगर परिसरात राहणाऱया सुनीता पाटील (40) या त्यांच्या तेथील एका पालिका शाळेसमोर त्यांच्या मुलाची वाट पाहत उभ्या असताना त्या ठिकाणी तोंडावर मास्क लावलेला एक दुचाकीस्वार आला. मग त्याने काही कळायच्या आत पाटील यांच्या गळय़ातील सोन्याची चेन हिसकावून नेली. चोरी करून पळून जाण्यात तो यशस्वीदेखील ठरला; पण त्याचा तो आनंद फार काळ टिकला नाही. पाटील यांनी वडाळा टी.टी. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक कालकुंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय भास्कर जाधव व पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले; पण आरोपीने मास्क घातल्याने त्याची ओळख पटत नव्हती. अखेर तांत्रिक बाबी व खबऱयांच्या मदतीने पोलिसांनी ट्रॉम्बे येथील चिता कॅम्प परिसरात राहणाऱया शोहेब अब्दुल मतिन शेख (23) या चोराला पकडले.