
देशात कोरोनाचे संकट वाढत असताना एक चांगली बातमी समोर येत आहे. गेल्या 14 दिवसात 15 राज्यातील 25 जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. या 25 जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळले होते. पुढील काळात या जिल्ह्यात एकही रुग्ण आढळणार नाही यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
25 जिल्ह्यांपैकी कर्नाटकातील 4, छत्तीसगड, हरयाणा, बिहारममधील 3, केरळ मधील 2 जिल्ह्यांच्या समावेश आहे. या पाच राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 888 आहे. त्यापैकी 285 रुग्ण बरे झाले असून घरी गेले आहेत. पाच राज्या एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या 100 तासांत एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. तसेच एकूण 7 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत.
























































