
फेसबुक अकाऊंटवरून सामाजिक तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकणाऱ्या एका तरूणाच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित सुरेश भावेकर (रा. कुरवंडे, लोणावळा, ता.मावळ, जि पुणे) असे या तरुणाने नाव आहे.
अमित भावेकर याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारे आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. अशा पोस्ट फेसबुकद्वारे प्रसारित करून समाजात तेढ अथवा शत्रुत्व व द्वेशाच्या भावना वाढवण्याचा प्रयत्न असल्याने संबंधित तरूणाच्या विरोधात भा.द.वि. कलम 153(अ), 505 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पो.ना. अमोल कसबेकर यांनी फिर्याद दिली असून पो.नि.मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा पोलीस पुढील तपास करीत आहेत.



























































