
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुका शिवसेनेच्या वतीने अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे अन्नछत्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन कालावधीपर्यंत अविरत चालू राहणार आहे. लॉकडाऊनमुळे अनेक जणांचे हातचे काम गेल्याने त्यांची गुजराण करणे कठीण झाले आहे. यामुळे शिवसेनेच्यावतीने अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले. आज कळंबचे तहसिलदार सौ. मंजुषा लटपटे यांनी अन्नछत्रस भेट दिली. त्यांच्या हस्ते आज गरजवंताना अन्न भोजनाचे वाटप करण्यात आले.
शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांनी अन्नछत्र चालु केले असून लॉकडाऊन उघडेपर्यंत हे अन्नछत्र सुरू राहणार आहे. याचा मोठा फायदा गोरगरीब, कष्टकरी लोकांना होत आहे.

































































