
नगर जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे शुक्रवारी सकाळी 8 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवले होते. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शुक्रवारी पुन्हा 9 व्यक्तींचे घशातील स्त्राव घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत 1546 व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 1473 व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एकूण 43 कोरोनाबाधित व्यक्तींपैकी 25 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 16 जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. दोन बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.























































