
गेल्या दोन दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. रविवारी रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे आणखी दोन पॉझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत. हे दोघेही मुंबईतून रत्नागिरीत आल्याचे समजते. कालच मुंबईतून रत्नागिरीत आलेले दोन कोरोनाबाधित रूग्ण सापडलेले असताना त्यात आणखी दोघांची भर पडलीय. त्यामुळे रत्नागिरीकर चांगलेच धास्तावले आहेत.
आज सापडलेल्या दोन पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये एक मंडणगड येथील तर दुसरा संगमेश्वर तालुक्यातील आहे.मुंबईतून रत्नागिरीत आलेले कोरोना पॉझिटिव्ह सापडत असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दहा झाली असून पाच रूग्ण बरे झाले आहेत तर एकाचा मृत्यु झाला आहे. येत्या काही दिवसात हा आकडा आणखीन वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.































































