
लातूर जिल्ह्यातील उदगीर हा रुग्णांचा हॉटस्पॉट ठरत आहे. आज उदगीर येथे कोरोनाचे दोन रुग्ण आढळले असून एकाची पुन्हा कोरोणा चाचणी केली जाणार आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञानळ संस्थेत रविवारी एकूण 13 व्यक्तींचे स्वॅब तपासणी साठी आले होते. त्यापैकी 12 व्यक्तीचे स्वॅब उदगीर येथून आले होते. त्यापैकी 4 व्यक्तीचे अहवाल आले असल्यामुळे त्यांच्या स्वॅबची 48 तासानंतर पुर्नतपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एका व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह व एकाव्यक्तीचा अहवाल पुन्हा आला असल्यामुळे त्यांची पुन्हा 48 तासानंतर स्वॅब घेऊन पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. उर्वरीत नव्याने आलेल्या 8 व्यक्तीचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील एका व्यक्तीच्या अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. सद्यस्थितीत एकही अहवाल प्रलंबित नाही अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर गिरीष ठाकूर यांनी दिली. उदगीर शहरात सध्या 10 कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे.



























































