
भाजपने राजकारणापासून दूर ठेवलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपण इच्छुक असल्याचे त्यांनी स्वतःहून बोलून दाखवलं आहे.
विधानपरिषद निवडणूक लढवण्याची इच्छा आपण पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे. यावर काय निर्णय घ्यायचा ते ठरवतील असे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. याआधी राज्यसभेसाठी माझ्या नावाची चर्चा करण्यात आली होती आणि पक्षाने देखील माझ्या नावाची शिफारस केली होती. मात्र तेव्हा ते होऊ शकले नाही. मला सुरुवातीपासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात रस होता आणि आजही आहे. त्यामुळे आपण विधानपरिषदेवर जाण्यास उत्सुक आहोत, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

























































